About Us / आमच्या विषयी

Ambedkari Sahitya Parishad was formed in 1992 to connect people with common ideals and aspirations, to provide a platform to those who are inspired by Dr B R Ambedkar's thoughts and philosophy to express their anguish through their literature against the opression and bigotry, and to make their presence felt in the world. Ambedkari Sahitya Parishad since then was succesfully able to organize two "Akhil Bharatiya Ambedkari Sahitya Sammelan" in Wardha  in 1993 and 1996. This was the historical begining, to reconceptualize and transform 'Dalit Sahitya' into 'Ambedkari Sahitya', after the name of our modern age hero Dr B R Ambedkar. We are helped in this mission by countless people, we sincerely thanked them and are proud of our acoomplishments. Join us in making this mission as your mission to keep our hero's thoughts and philosophy alive to change this world for the better. 'नव्या जगाच्या निर्मिती साठी, आधुनिक युगाचे नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्या विचारांना आपल्या लेखणीतून जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या साहित्यिकांना जोडण्यासाठी, असमानता आणि सामाजिक शोषनाविरुद्ध त्यांच्या विद्रोहाला, आक्रोशाला आपल्या साहित्यातून जगभर पोह्चविन्याचे एक माध्यम म्हणून १९९२ साली आंबेडकरी साहित्य परिषदेची निर्मीती करण्यात आली. तेंव्हा पासून आता पर्यन्त आंबेडकरी साहित्य परिषदेने यशस्वीरीत्या दोन अखिल भारतिय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे आयोजन केले. पाहिले अ. भा. आंबेडकरी साहित्य सम्मलेन १९९२ साली तर तिसरे १९९६ साली वर्धा येथे पार पडले. आधुनिक युगाचे नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरनेने निर्माण झालेले "दलित साहित्य" या नंतर "आंबेडकरी साहित्य" या नावाने ओळखले जावे याची ही एक ऐतिहासिक सुरवात होती.  आंबेडकरी साहित्य परिषदेला या प्रक्रिये मधे असंख्य लोकानी मदत केली, त्या सर्वाना आंबेडकरी साहित्य परिषद मानाचा मुजरा करते. नविन जगाच्या निर्मिति साठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा हा प्रवाह असाच कायम राहावा म्हणून चला आपण सर्व या प्रक्रियेमध्ये सामिल  होऊ या.                

 

President: Arvind Nikose  अध्यक्ष : अरविन्द निकोसे  

Working President: Ashok Khanade                      कार्याध्यक्ष : अशोक खनाडे           

Vice President : Mahendra Muneshwar                  उपाध्यक्ष : महेंद्र मुनेश्वर

Secretary: Buddhapriya Thool  सचिव : बुद्धप्रिय थूल  

Deputy Secretary: Umesh Gaikwad 

सहसचिव: उमेश गायकवाड      

Treasurer: Pravin Polke  कोशाध्यक्ष : प्रवीन पोळके      

Members: Shashikant Patil, Diwakar Kanhekar, Rahul Zamare, Jayakant Patil, Milind Sakharkar 

सदस्य : शशिकांत पाटिल, दिवाकर कान्हेकर, राहुल झामरे, रविकांत पाटिल, मिलिंद साखरकर

 अ. भा. आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळ

 
ज्या संस्था आंबेडकरी समाज, साहित्य आणि संस्कृतीच्या विकासासाठी आणि संवर्धनासाठी कार्यरत आहे. त्या संस्थांचे हे महामंडळ असून सलग तीन वर्ष कार्यरत असणारया नोंदणीकृत  अथवा अनोंदणीकृत पण, सलग कार्यरत असण्याच्या पुरावा असलेल्या भारतातील कुठल्याही संस्था या महामंडळाच्या सभासद असू शकतात. ह्या महामंडळाची निर्मिती २००८ मध्ये झाली. ज्या संस्थांनी नऊ अ. भा. आंबेडकरी साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते त्या संस्थांचे दोन प्रतिनिधी (अध्यक्ष/सचिव ) आणि दहावे साहित्य संमेलन आयोजित करू इच्छिणाऱ्या संस्थांचे दोन प्रतिनिधी अशा एकंदर सात संस्थांच्या प्रतिनिधींच्या सभेत हे महामंडळ स्थापन करण्यात आले. या महामंडळाच्यावतीने विविध ठिकाणी वेगवेगळ्या(अ. भा. /युवा/महिला /विद्यार्थी ) साहित्य संमेलनाचे आयोजन स्थानिक संस्थांच्यावतीने करण्यात येईल. ज्या संस्थेला असे आयोजन करावयाचे असेल त्यांनी तसा प्रस्ताव  या महामंडळाकडे पाठवावा त्यावर मंडळ निर्णय घेऊन हे संमेलन त्या संस्थाना घेण्यास परवानगी देईल.
 
अध्यक्ष : आयु. अशोक बुरबुरे, हिंगणघाट  जिल्हा वर्धा,  (महा ),                                       भ्रमणध्वनी :  ९९७०५४६२३६ 
सचिव : आयु. आनंद गायकवाड,  यवतमाळ (महा), भ्रमणध्वनी : ९४२२१६७२९९
निमंत्रक : प्रा. सतेश्वर मोरे, अमरावती (महा) भ्रमणध्वनी : ९४२२८५७४८३
संपर्क :  बाबासाहेब  आंबेडकर संस्कार भवन, भीमटेकडी, परिसर अमरावती 
ई- मेल sateshwarmorey@gmail.com

This free website was made using Yola.

No HTML skills required. Build your website in minutes.

Go to www.yola.com and sign up today!

Make a free website with Yola